मंदाकिनी चव्हाण चेअरमन तर बेबी शितोळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड
गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
पाटस:दौंड तालुक्यातील पाटस येथील 'दौंड तालुका महिला विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित' या संस्थेची सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे बिनविरोध पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री. देविदास मिसाळ यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील तरतुदींनुसार, प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही प्रक्रिया शांततेत पार पडली.
निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी (चेअरमन) सौ. मंदाकिनी शहाजीराव चव्हाण यांची, तर उपाध्यक्षपदी (व्हाईस चेअरमन) सौ. बेबी संजय शितोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून सौ. सविता संजय पाटणकर, सौ. अवंतिका अभिजीत शितोळे, सौ. छाया रामदास शितोळे, सौ. पुजा योगेश चव्हाण, सौ. अश्विनी सुरज सोनवणे, सौ. मंगल रमेश चव्हाण, सौ. सुरेखा काशिनाथ भागवत आणि सौ. शिल्पा राकेश लोखंडे यांचा समावेश आहे.
संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात सचिव म्हणून सौ. निकिता अमोल शितोळे, व्यवस्थापक म्हणून श्री. महेश रविंद्र बगाडे आणि लेखनिक म्हणून सौ. सुनिता प्रविण ताकवले जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच संस्थेचे पिग्मी एजंट म्हणून श्री. बापूराव किसन बारवकर, श्री. बाळासो यशवंत नानवर आणि श्री. गौरव दोरगे हे कार्यरत आहेत. या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील, असा विश्वास नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
"संस्थेची निवडणूक बिनविरोध करून सभासदांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक कारभाराला आम्ही प्राधान्य देऊ. संस्थेच्या आजवरच्या प्रगतीत आणि आर्थिक शिस्तीमध्ये व्यवस्थापनाचा वाटा अत्यंत मोलाचा असून, त्यांच्या उत्तम समन्वयामुळेच संस्थेची विश्वासार्हता टिकून आहे."
चेअरमन सौ. मंदाकिनी चव्हाण





Social Plugin