Ticker

6/recent/ticker-posts

बारलिंगा गावामध्ये माता रमाई जयंती मोठ्या उत्साहाने साजरी.





राजेंद्र नागरे प्रतिनिधी दुसरबीड

आज बारलिंगा गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बारलींगा हे गाव खूप छोटे असून तेथे तीन समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात धनगर वंजारी आणि बौद्ध हे तीनही समाज समतोल आहेत परंतु हे तीनही समाज कोणाचाही सामाजिक कार्यक्रम असेल मोठ्या गुण्यागोविंदाने मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा करतात कुठलाही जाती भेद कोणीही करत नाही संपूर्ण गावामध्ये डीजेच्या तालावर सर्व गावकरी गावभर माता रमाई यांची जयंती साजरी करतात प्रत्येक जण माता रमाईला औक्षण करतात गावामध्ये प्रत्येक घरासमोर माता रमाईचे स्वागत केले  जाते शेवटी पूर्ण गावामध्ये मिरवणूक झाल्यानंतर बुद्ध विहारांमध्ये सर्व गावातील मंडळी जमून माता रमाई चे पूजन केले जाते आणि शेवटी पंचशीला पठाण करून कार्यक्रमाचे सांगता केली जाते