डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
संत सेवालाल महाराज जयंती निमित्त शिक्षक काँलनी कारंजा येथे दि.१७/०२/२०२६ ला महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयकिसनभाऊ राठाेड माजी सभापती जि.प.वाशिम हे हाेते. कार्यक्रमाचे विशेष अतीथी श्रीमती सईताई प्रकाशरावजी डहाके ह्या हाेत्या.प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित नगर परिषद सदस्य शालिनीताई प्रशांतजी ठाकरे,साै.ज्याेतीताई प्रवेश राठाेड,प्रशांतजी ठाकरे,श्री प्रवेश राठाेड,श्री सागर अंभाेरे,श्री संजयभाऊ राठाेड,श्री भाऊरावजी जाधव यांची उपस्थीती हाेती.कार्यक्रमाता महिला भगीणींनी आपले पारंपारीक पाेषाक धारण करीत आपली गाणी म्हणुन डफाच्या तालावर गाणी म्हणुन नाचतांना दिसत हाेत्या तसेच पुरूष मंडळी त्यांना साद घालतांना दिसत हाेते.विशेष अतिथींचे एका वेगळ्या थाटात स्वागत करण्यात आले.विशेष अतिथींचे समयाेचीत भाषणे झाली व अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता जगदंबा माता मंदीर व संत सेवालाल महाराज मंदीर शिक्षक काँलनी शेरपुर कारंजा या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व शिक्षक कालनी मधील सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
महाप्रसादाचा हजाराे भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसाद घेण्यासाठी जमलेला जनसमुदाय...
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्रा.दिलीपराव चव्हाण तर प्रास्ताविक प्राचार्य श्री भरतभाऊ राठाेड यांना केले.





Social Plugin