Ticker

6/recent/ticker-posts

विकृतीने माखलेल्या समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज. निलेश राठोड यांचे प्रतिपादन .



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : तालुक्यातील डोळंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आयुष्यात प्लॅनिंग हे किती महत्त्वाचे आहे, जिजाऊंनी शिवरायाला कसे घडवले व शिवराय सुद्धा संस्कार विसरले नाही. याबद्दल सखोल मार्गदर्शन करत अंगावर शहारे आणणारी घटना डोळ्यासमोर मांडत व्याख्याते निलेश राठोड यांनी श्रोत्यांची मने जिंकली.मंच्यावर ज्ञानदीप भगत, विठ्ठल पंत चिबडे,नितीन नाईक,बाळकृष्ण मानतुटे,आतिश जाधव,हे होते. 

यावेळी गावातील मोफत शिकवणी करणाऱ्या तरुणांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या जयंती सोहळ्यात स्लो सायकल,संगीत खुर्ची, लिंबू चमचा,रांगोळी स्पर्धा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. एन. एल. राठोड यांनी शिवाजी महाराज नसते तर आपले काय झाले असते. याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन निलेश गोपाळा जाधव यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय राऊत, जय देशमुख दिनेश पतंगे, गुणवंता राठोड,आकाश जाधव, सौरव देशमुख,किशोर जाधव,अक्षय जाधव,राहुल राठोड,अभय कोरपकवार यांनी परिश्रम घेतले.