पारनेर प्रतिनिधी.
नांदूर पठार चे सुपुत्र आणि पूर्णा पालम ,गंगाखेड मतदार संघाचे मा.आमदार सिताराम मामा घनदाट यांचे दोन नातू भरत घनदाट आणि अमित घनदाट परभणी जिल्ह्यात दोन जिल्हा परिषद गटात प्रचंड मतांनी विजयी झाले .
मराठवाड्यात जाऊन दोन्ही भूमिपुत्रांचा विजय झाला त्याबद्दल नांदूर पठार गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ,निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमितदादा घनदाट मूळगावी नांदूर पठार येथे आल्यामुळे टाकळी जिल्हा परिषद गटाचे नेते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड झाल्यावर नांदूर पठार ग्रामस्थांच्या आणि मुंबईकर ,पुणेकरांच्या वतीने मोठा सत्कार संभारभ ठेवण्यात येणार असल्याचे रविंद्र राजदेव यांनी सांगितले.
यावेळी मा.सरपंच भानुदास आग्रे ,खंडोबा देवस्थानचे सचिव चंद्रभान ठुबे ,गोरेगावचे मा.सरपंच अभयाशिंह नांगरे ,युवा नेते माधवशेठ आग्रे ,भाऊसाहेब गायकवाड ,जनार्दन चौधरी ,रंगनाथ राजदेव ,भाऊसाहेब चौधरी ,रवींद्र घोलप ,रविंद्र चौधरी ,प्रणव पानसरे ,गणेश देशमाने ,शिवाजी हाके ,काशिनाथ चिकने आदी मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin