Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे हराळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

 


प्रतिनिधी :विजय गायकवाड

वाशिम: वाशिम येथील प्रसिद्ध तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमित्त दिनांक 19/02/2026 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय हराळ येथे ठेवण्यात आले असून या शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ सौरभ सरकटे, जनरल सर्जन डॉ नितेश गायकी व मनोविकार तज्ञ  डॉ राहुल डोंगरे हे तज्ञ  मोफत तपासणी करणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन या तज्ञ डॉक्टरानी केले आहे. या मोफत तपासणी शिबिराची वेळ सकाळी नव ते दुपारी दोन पर्यंत मौजे हराळ ता रिसोड येथे आहे.