Ticker

6/recent/ticker-posts

रात्री उशिरा चंद्र दर्शनाची साक्ष; उद्या पहिला रोजा.



नाशिक, प्रतिनिधी, अमन शेख 

रमजान महिन्याचा चंद्र पाहण्यासाठी आज बुधवारी (दि. १८) शहर व परिसरातगर्दी केली होती, मात्र सुरुवातीला हवामान स्वच्छ असूनही कुठेही चंद्र दिसला नव्हता. मात्र, रात्री उशिरा शहराबाहेरून तसेच शेजारील भागांतून चंद्रदर्शनाची विश्वसनीय इस्लामी साक्ष प्राप्त झाल्यानंतर शहर चांद समितीने निर्णयात बदल केला.

मिळालेल्या साक्ष दखल घेत गुरुवारी (दि. १९ फेब्रुवारी) रमजान महिन्याचा पहिला रोजा ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती शहर चांद समितीकडून देण्यात आली.

या बदललेल्या निर्णयाची माहिती तात्काळ शहरातील सर्व मशिदी, धार्मिक संस्था व मुस्लिम नागरिकांना देण्यात आली आहे. प्राप्त साक्ष योग्य व विश्वासार्ह असल्याने हा निर्णय अंतिम असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

या बैठकीस खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन आशरफी, सैयद आसिफ इक्बाल रझवी, मौलाना मुश्ताक अहमद अहमदी, मुफ्ती मोहम्मद अली अहमदी तसेच चांद समितीचे सदस्य उपस्थित होते.