पाटण(दिनकर वाईकर)
पाटण तालुक्यातील मणदुरे विभागातील साखरी ता पाटण येथे मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास गिरगांव येथील हरी गणपती सावंत यांच्या राहत्या घरा शेजारील गवताच्या गंजीना आग लागल्याची घटना घडली दरम्यान गावातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले तसेच यावेळी मरळी येथील बाळासाहेब देसाई कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवण्यास मोंठी मदत झाली या घटनेत सात हजार आठशे रुपयांचे नुकसान झाले आहे
या बाबत घटनास्थळआ वरून मिळालेल्या माहितीनुसार हरी सावंत यांच्या घरापाठीमागील असनाऱ्या गवताच्या गंजीना अचानक आग लागली असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले त्यावेळी आरडाओरडा केल्याने गावातील ग्रामस्थांनी एकत्र जमा होऊन गंजीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्तीने प्रयत्न केले त्यानंतर अग्निशमन दलाचे ही मोठे सहाय्य मिळाले घराशेजारी गंज असल्याने मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकले असते मात्र गावातील युवक व ग्रामस्थांनी ही वेळीच परिश्रम घेतले यावेळी पाटण पोलीस हजर झाले होते या घटनेत सात हजार आठशे रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी सौ, एस ,के ,कुदळे यांनी दिली
याबाबत शेतकरी हरी सावंत यांनी पाटण पोलीसात तक्रार दाखल केली असून महसूल विभागाने अगोदर जागेवर येवून पंचनामा करणे क्रमप्राप्त होते माञ घटनास्थळी न जाताच पंचनामा करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला तालुका ठिकाणी येण्यासाठी बोलावणे धाडल्याने स्थानिक ग्रामस्थ व युवक यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी गावातील युवकांनी वैरणीची ओझी जमा करुन मुक्या जनावरांयांच्या मदतीला धावून आले





Social Plugin