गुणवत्तेची कदर करणारी माणसे जेथे असतात,तेथे खरे माणिक मोती घडतात: प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
बुथ दि . [प्रकाश राज्रेघाटगे ]
गुणवत्तेची कदर करणारी माणसे जेथे असतात,तेथे खरे माणिक मोती घडतात.गुणवंतांना प्रोत्साहन देणारे सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ हे जागृत ऊर्जापीठ आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते, लेखक, डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
संभाजीनगर,सातारा येथील राष्ट्रभाषा भवनच्या मुख्य सभागृहात आयोजित करणेत आलेल्या सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या ४२व्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून पाटणे बोलत होते यावेळी प्रमुखाअतिथी म्हणून डॉ. सुवर्णा कांबळे, प्राध्यापक कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा, मंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी, सचिव हणमंत सूर्यवंशी, मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे, कार्यवाह अनंत यादव ,उपाध्यक्ष शाहानवाज मुजावर, इकबाल मुल्ला, परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, वाचनालय सचिव गुलाब पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य पाटणे पुढे म्हणाले, गुणवत्ता म्हणजे परीक्षेतील गुणांची गोळाबेरीज नसते. परीक्षेतील गुणाइतकेच कलागुणही महत्त्वाचे असतात, याच दृष्टीने ता.का.सूर्यवंशी यांच्या ज्ञाननिष्ठेतून आणि हिंदी भाषा निष्ठेतून 'राष्ट्रभाषा भवन' उभे राहिले आहे.
राष्ट्रभाषेतील निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतून उद्याचे राष्ट्रीय लेखक-वक्ते घडू शकतात.मातृभाषा आणि राष्ट्रभाषा एकमेकींच्या भगिनी आहेत.भाषेद्वारे आपण ज्ञान आणि संस्कृती पुढच्या पिढीला प्रदान करीत असतो ज्ञानप्राप्तीसाठी राष्ट्रभाषेची मैत्री जोपासली पाहिजे . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.तदनंतर मंडळाच्या गीतमंचाने सुस्वरात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ता.का. सूर्यवंशी म्हणाले अनेक समस्यांचा सामना करत मंडळ पुढे जात आहे. संस्थेच्या द्वारे नऊ संस्थांचा कारभार चालवला जातो.मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात ७०० पेक्षा जास्त पुरस्कार दिले जातात .विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम केले पाहिजेत, सुखासाठी आळस त्यागून कष्टाची तयारी ठेवली पाहिजे.शालेय जीवनात नवनवीन गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत.
प्राध्यापिका सुवर्णा कांबळे म्हणाल्या व्यक्तित्वाला आकार देण्याचे काम शिक्षण करते .हिंदी अध्यापक मंडळ शिक्षकांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम अखंडपणे करते. राज्यस्तरीय निबंध लेखनातून चांगले विचार पुढे येतात. हिंदी भाषा सर्वत्र वाढत आहे ती संघर्षाचा सामना करत आहे अशावेळी हिंदी अध्यापक मंडळ प्रेरणास्रोत बनून कार्य करीत आहे.
यावेळी गुणवंत,उपक्रमशील हिंदी अध्यापक,राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार अध्यापक पुरस्कार,राज्यस्तर शिक्षक निबंध, जिल्हा स्तर शिक्षक निबंध व वक्तत्व असे शिक्षकांचे ४५ व ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे ७१ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन मिनाक्षी बडिगार व विजयकुमार पिसाळ यानी केले.शाहनवाज मुजावर यानी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी तालुकाध्यक्ष संतोष शिर्के, विकास लादे,संजय शिंदे,महाळाप्पा शिंदे, मनोहर काटकर, विनायक बगाडे, अशोक धुमाळ,अनिल कदम, संजय काटवटे व्यवस्थापक नवनाथ शिंदे त्यांचे सर्व सहकारी यानी विशेष परिश्रम घेतले.





Social Plugin