बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
राजापूर मधील उद्योजक शेतकरी व गावखेडाचे संस्थापक श्री अजित दिडके यांनी महाराष्ट्रातील पहिले गावठी कोंबडी टुरिझम राजापूर येथे चालु केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील गावठी अंड्याच्या वाढत्या मागणीचा विचार करून "गावखेडा"ब्रँडच्या माध्यमातून गावठी अंड्यासाठी नवीन बाजारपेठ तयार करणे व तयार बाजारपेठेला सक्षम करणे. व स्वतःची विक्री संस्था उभी करण्याबरोबरच गावखेडाच्या माध्यमातून खरेदी विक्री केंद्र उभे करून मध्यस्थ कमी करणे याबरोबर देशी अंड्याची बाजारात मार्केटिंग व ब्रँडिंग करून शेतकरी सदस्यांना शाश्वत नफा मिळवून देणे. यासाठी "गावखेडा" मार्फत डिस्कळ येथे ज्ञानेश्वर मंदिरात चर्चासत्र आयोजित केले होते. यासाठी डिस्कळ पंचक्रोशीतील राजापूर, बुध,चिंचणी, मोळ, ललगून, अनपटवाडी, ताथवाडा, एकंबे, वाडा खेड, निनाम पाडळे, येथून शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गावखेडा ब्रँडच्या मार्फत शेतकऱ्यांचे एक प्रभावी संघटन तयार करून देशी अंड्यांना गावखेडा या ब्रँडच्या माध्यमातून मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन याबाबत गांवखेडाचे संस्थापक श्री अजित दिडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत डिस्कळ गावचे माजी सरपंच श्री रविराज लाड व प्रास्तविक श्री हणमंतराव नलवडे यांनी केले.





Social Plugin