Ticker

6/recent/ticker-posts

गोळेगाव येथे संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा






दत्ता पवार : ग्रामीण प्रतिनिधी 

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गोळेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या किर्तनात किर्तनकार यांनी माणसाने भक्ती करुन आध्यात्मिक जिवन जगावे व जिवनात संतांना सद्गुरुना शरण जावे तरच या देहाचा उध्दार आहे नसता मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही 

किर्तन संपल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसाद वाढण्यासाठी महिला तरुण यांची उपस्थिती लक्षणीय होती सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त या सोहळ्यात आवर्जून सज्ञभागी होतात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री ंच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून रविवारी असल्यामुळे या ठिकाणी दुर दूर वरून भाविक दाखल झाले होते या प्रगट दिन सोहळ्यात हजारों भाविकांची हजेरी लावत गणी गण गणात बोते या मंत्राचा जयघोष करत श्रींचे चरण दर्शन घेतले संस्थान तर्फे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुंदर असे नियोजन करण्यात आले होते.