Ticker

6/recent/ticker-posts

*सहकार विद्या मंदिर दे मही येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सहात साजरी .



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे मही येथे शिवजयंती मोठया थाटात व उत्साहात साजरी झाली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार विद्या मंदिर चे मुख्याध्यापक आदरणीय श्री प्रकाश इंगळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आदरणीय श्री खेडेकर, श्री दुडायर सर सौं दीपिका शिंगणे मॅडम सौं दुगड मॅडम हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवरच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ याच्या प्रतिमा पूजनाने पुष्पाहर अर्पण करून करण्यात आली. प्रमुख मान्यवराच्या सत्कारानंतर कार्यक्रमचे प्रास्ताविक श्री भानुसे सर(इतिहास शिक्षक )यांनी आपल्या विशेष शैलीत मांडत कार्यक्रमाची रीतसर सुरवात करण्यात आली. यामध्ये विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेले मातीचे  

व शाडूचे विविध गडकिल्ले जे अतिशय मनमोहक होते ज्याचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले.काही विद्यार्थ्यांनीआपले मनोगत व्यक्त करीत शिवरायच्या जीवनावर प्रकाश टाकला तर काहींनी आपल्या विशेष शैलीत अभिनयसह पोवाडे सादर केली तर श्री विजय बनसोडे सर यांनी आपल्या गोड मधुर अवजातून शिवरायावर एक सुंदर असे गीत सादर केले.सदर कार्यक्रमात शिवरायांचा पाळणा, स्वराज्य स्थापनेची शपथ,पोवाडा,शिवगीत,गोंधळ असे विविध बहारदार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी आघाव व गायत्री मुंढे या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन श्री केशव तळेकर सर यांनी केले...कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रतिभा शिंगणे,शेळके मॅडम,भुतेकर मॅडम,प्राजक्ता देशमुख ,नंदकिशोर पडघन ,शिवशंकर शिंगणें, राजेंद्र भानुसे, डोईफोडे,सुनील आंधळे,राहुल शेळके व केशव तळेकर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले..