Ticker

6/recent/ticker-posts

झोडगा धरणाच्या कॅनॉल च्या पाण्यासाठी शिवसेनेचा इशारा– निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन.



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा तालुक्यातील झोडगा धरणाच्या पाण्याचा लाभ भुलोडा, ब्राह्मणवाडा, औरंगपूर व कामरगाव येथील शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा, या मागणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सन २००८-०९ मध्ये बांधण्यात आलेल्या झोडगा धरण प्रकल्पाला अनेक वर्षे उलटूनही कालव्याचे काम अपूर्ण असल्यामुळे शेतकरी जलसिंचनापासून वंचित आहेत. शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्ष फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले असून तात्काळ काम सुरू करून पूर्ण करण्याचा ठोस निर्णय न घेतल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित विभागातून काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर मागणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यावेळी क्षमानंद निमगडे , प्रशांत भाऊ लाकडे, मंगेश मसनकार, शहर संघटक ऍड संदेश जिंतूरकर, मा.पंचायत समिती सदस्य रवी भाऊ भुते, वैद्यकीय प्रमुख शुभम भोयर व शेतकरी बांधव उपस्थित होते