Ticker

6/recent/ticker-posts

*अंबड येथील मापारी सर यांच्या यशोदीप ब्रिलियंट अकॅडमी अबॅकस सेंटरच्या मुलांचे घवघवीत यश*



अंबड प्रतिनिधी,

गणेश सपकाळ

विद्यार्थ्यांच्या यशाबरोबर यशोदीप ब्रिलियंट अकॅडमीचाही त्याची यशाचीपताका कायम ठेवली मुंबई ठाणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत अंबड येथील मापारी सर यांच्या यशोदीप ब्रिलियंट अकॅडमी अबॅकस सेंटरच्या मुलांनी घवघवीत यश मिळवले असून या स्पर्धेत कु.भक्ती प्रकाश शेळके हिने एच कॅटेगिरीतून भारतातून प्रथम क्रमांक मिळवला,द्वितीय क्रमांक कु.श्रावणी ऋषिंद्र मुळे,चि.स्वरांश बदक याने पटकावला आहे.त्याचप्रमाणे चि.यश योगेश खरात याने बी कॅटेगरीतून भारतातून तिसरा क्रमांक मिळवला तर पूजा दिवटे,धनराज कडूळे,अविनाश डावकर,स्वराज तारक या विद्यार्थ्यांनी चौथा क्रमांक पटकवला.तर पार्थ मुळे,अविनाश दिवटे,गायत्री सव्वाशे,उत्कर्ष पाष्टे,भक्ती खरात,कल्याणी पावशे,प्रमोद कुकडे,राजवीर काळे,यांनी पण उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशा बरोबर अंबड येथील यशोदीप ब्रिलियंट्स अकॅडमी यानी आपली यशाची पताका फडकवली असून या अबॅकस सेंटरला भारतातून प्रथम क्रमांक मिळाला तर प्रशिक्षक सौ.प्रजाती श्रीकृष्ण मापारी यांना भारतातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.क्विझ स्पर्धेत भक्ती प्रकाश शेळके व वरद बिरनाळे व श्रीकृष्ण मापारी सर या तिघांनी मिळवून क्विज स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक मिळवला आहे व रोख रक्कम आठ हजार रुपये पारितोषिक तीन ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.या यशाबद्दल या सर्व विजेत्या मुलांचे तसेच यशोदीप ब्रिलियंट अकॅडमी अबॅकस सेंटरचे अंबड मधील नागरिकाकडून कौतुक होत आहे.यावेळी अंबडच्या नगराध्यक्षा सौ.देवयानी केदारदादा कुलकर्णी,केदार कुलकर्णी,दिपक लोहकरे,सतिश गायकवाड,प्रकाश शेळके,डॉ रामनाथ तिकांडे,माजी मुख्याध्यापक आर जे मापारी सर,एडवोकेट युवराज मापारी, पत्रकार संतोष जिगे,नयुम पठाण,सचिन राठौर,अमोल कुलकर्णी,जम्मूभाई,बाबा पठाण,लक्ष्मण राऊत अनेकांनी विजेत्या विद्यार्थ्याचे व त्यांच्या गुरुजनाचे अभिनंदन केले आहे.