टेंभुर्णी प्रतिनिधी
विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शिवाजी फलके यांची तर उपाध्यक्षपदी भरत फलके व दिलीप फलके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती निवडीसाठी मंगळवारी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ही समिती निवडण्यात आली. समितीच्या इतर सदस्यांमध्ये पंचफुला चंदनराव फलके,मीना रमेश फलके, कविता समाधान डोमाळे, पूनम अमोल हिवाळे, पूजा संदीप गरंडवाल, शांताबाई महादू फलके जगदीश फलके, दमोता फलके (शिक्षणतज्ञ),अंकुश फलके, जगदीश डोईफोडे (शिक्षक प्रतिनिधी), मुख्याध्यापक राजेंद्र दंदाले (सचिव) यांना स्थान देण्यात आले आहे. तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुरज हिवाळे व स्वाती फलके यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित समितीचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच समाधान फलके, उपसरपंच चंदनराव फलके, राजू हिवाळे, मुख्याध्यापक राजेंद्र दंदाले, शिक्षक कैलास चेके, संतोष नागरे, जगदीश डोईफोडे आदींची उपस्थिती होती. फोटो- तपोवन गोंधन येथील नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचा सत्कार करताना ग्रामस्थ व शिक्षक.





Social Plugin