Ticker

6/recent/ticker-posts

८ मार्च रोजी अमडापूर येथे भव्य ‘विधी सेवा महाशिबिर’ व शासकीय योजना महामेळावा!



धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा चिखली (दि. २७) :-- 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील अमडापूर येथे ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा-योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या शिबिराच्या नियोजनाचा आढावा डॉ. किरण पाटील यांनी घेतला. शिबिरात सुमारे ५० शासकीय स्टॉल्सद्वारे नागरिकांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.

🔹 आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती

🔹 संजय गांधी निराधार योजना

🔹 श्रावणबाळ योजना

🔹 घरकुल योजना

🔹 आयुष्मान भारत कार्ड

🔹 जात व उत्पन्न दाखले

🔹 नवीन रेशन कार्ड

🔹 तसेच इतर विविध शासकीय सेवा

यासोबतच नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देखील उपलब्ध होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील व तज्ज्ञ प्रलंबित प्रकरणांबाबत मार्गदर्शन करतील.

महिला, शेतकरी व गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 स्थळ : अमडापूर, ता. चिखली

 दिनांक : ८ मार्च

 वेळ : सकाळी १० वाजता