Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड तालुक्यातील गौताळा घाटाची त्वरीत दुरुस्ती करण्याची सामाजिक कार्यकर्ते तोताराम पवार यांची मागणी.



यशवंत पवार कन्नड 

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य छत्रपती संभाजीनगर पासुन 60 किलोमीटर तर जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव पासुन नागद मार्गे अवघे 45 किलोमीटर आहे. 

हे अभयारण्य विविध दुर्मीळ औषधी वनस्पती, वन्यजीव, आणी ऐतिहासिक कारणाने प्रसिद्ध आहे. 

 छत्रपती संभाजीनगर पासुन चाळीसगाव जाण्यासाठी औट्रम घाट आहे. आणी गौताळा, नागद  मार्गे गौताळा घाट आहे. परंतू कोर्टाच्या आदेशानुसार औट्रम घाटातील जड वाहतूक बंद करण्यात आली असल्या मुळे सर्व जड वाहतूक गौताळा अभयारण्यातील गौताळा घाटातुन होत असल्यामुळे या घाटाची अक्षरश: चाळण झाली असल्यामुळे या घाटात रोज छोटे मोठे अपघात होत आहेत,  मोठ्याच काय लहान वाहनांना त्रास होत आहे ,सामान्य नागरिकांना आणी वाहण चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यटकांनी तर ईकडे पाठच फिरवली आहे. याची दखल शासन अथवा कोणतीही राजकीय व्यक्ती घेत नसल्याचे पाहुन नागद येथील सामाजिक कार्यकर्तै तोताराम पवार हे रोज गौताळा घाटात जावुन वाहन धारकांना मदत आणी मार्गदर्शन करत आहेत. 

 या बाबत त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, शेजारील चाळीसगाव घाटाला शासन  दोन ते अडीच हजार कोटी रुपये देतात आणि माझ्या गौताळा घाटाला एक रुपये सुद्धा देत नाही.

     यावरून असं दिसतं की राजकीय लोक राजकारण करुन सामान्य नागरिकांना त्रास देत आहे.

  आजी माजी आमदार - खासदार  यांनी  काम केले असेल किंवा नसेल पण आत्ताचे जे आमदार आहेत ,खासदार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण थोडाफार गौताळा घाटाकडे लक्ष द्या आणि कामाला  सुरुवात करा. 

 शासनाने हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अन्यथा  मोठी दुर्घटना घडण्याची शासन वाट पहात आहे का याची शंका येते, 

तरी हे काम त्वरीत हाती घ्यावे अशी मागणी तोताराम पवार, , ईतिहास अभ्यासक डॉ.रमेश सुर्यवंशी, डॉ.यशवंत पवार, परिसरातील नागरिक, वन्यजीव प्रेमी, निसर्ग प्रेमी यांनी केली आहे.