"मुख्यमंत्री माझी शाळा,
सुंदर शाळानिकाल जाहीर"
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या नावाजलेल्या संस्थेचे श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम व तांत्रिक विभाग या आदर्श शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक तीन अंतर्गत झालेल्या स्पर्धेत खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेने गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, श्रम प्रतिष्ठा,देशसेवा, ग्रामसेवा तसेच व्यवसायाभिमुख मूल्यशिक्षण रुजवणारी ग्रामीण भागातील अतिशय नावाजलेली शाळा आहे. सामाजिक, राजकीय,आर्थिक, प्रशासकीय, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. श्री.सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव,सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,सर्व विश्वस्त व पदाधिकारी, विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, श्री. के. डी. पवार सर, श्री. डी.पी. शिंदे सर, श्री जयंतराव जाधव, श्री एस. आर. पाटील सर, खटाव पंचायत समिती (वडूज )गटशिक्षणाधिकारी श्रीमती सोनाली विभुते मॅडम, विस्तार अधिकारी सौ. संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख श्री नवनाथ गावडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री धनंजय चोपडे साहेब, आजी माजी विद्यार्थी संघ, पुसेगाव व पुसेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी प्राचार्य श्री डी. एन.गोफणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.
छायाचित्र - पुसेगाव - श्री हनुमानगिरी हायस्कूलचे भव्य मैदान व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विदयार्थी कलाकार





Social Plugin