टाकळी ढोकेश्वर.
पारनेर प्रतिनिधी.
नगर कल्याण हायवे चे काम सध्या काँक्रीटीकरणचे काम चालू आहे ,परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे , ट्राफिक झाली तरी गार्ड ची सुविधा नाही ,कुठे सूचना फलक नाही त्यामुळे परवा काळेवाडी येथे अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थाकडून उपस्थित होत आहे.
टाकळी परिसरात रस्त्याचं काम चालू असतानाच रस्त्याला चिरा गेलेल्या आहेत ,काँक्रिट टाकल्यावर त्याला पाणी पुरेशा प्रमाणात मारले जात नसल्याचा आरोप रविंद्र राजदेव यांनी केला.
ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात गेलेली आहे ,खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यायला सांगून दोन महिने झाले तरी आणखी प्रशासनाने नुकसान भरपाई दिलेली नाही.
ह्या कामात येत्या दोन दिवसात सुधारणा झाली नाही तर निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव आणि टाकळी ढोकेश्वर चे सामाजिक कार्यकर्ते महेश झावरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.





Social Plugin