गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा : भारतीय राज्यघटनेत समता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता यांसारखी मूलभूत मूल्ये प्रतिबिंबित झाली असून हीच मूल्ये छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून प्रेरित झालेली आहेत, असे मत व्याख्याते डॉ. अशोक बांगर यांनी व्यक्त केले. ते शिवव्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी “शिवरायांचे प्रेरणादायी चरित्र” या विषयावर बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना तयार करताना कोणती प्रेरणा होती, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा प्रभाव असल्याचे सांगितल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबात आणि समाजात शिवचरित्रातील आदर्श आचरणात आणणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ञ डॉ. पंकज काटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी गिरीश जतकर, श्यामशेठ अग्रवाल, उर्मिलाताई ठाकूर, तेजस्विनी देववर्त डहाके, चंदाताई कोळकर, शालिनीताई ठाकरे, अघम काकू तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले उपस्थित होते.
यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम सभापती बाबुराव चौधरी, नगर परिषदेचे बांधकाम सभापती हुसेन बंदूकवाले, नियोजन सभापती नदीम राज, नगरपरिषद सदस्य इम्रान पारेख, पत्रकार ज्ञानेश्वर धुळे, आदर्श शिक्षिका ज्ञानदेवी मंदिर, आदर्श शेतकरी अजय मोटघरे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, समाजसेविका वर्षाताई शाहू भगत, सर्प अभ्यासक प्रा. राजा गोरे,प्रा रमेश वरघट आशा सेविका वैशाली लोमटे, जिग्नेश लोडाया,आदर्श शिक्षक विजय भड, आरोग्य सेवक रमेश देशमुख आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पापडे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय विजय भड यांनी करून दिला. आभार प्रदर्शन रामदास मिसाळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष आरिफ पोपटे, प्रा दिनेश रघुवंशी कालुभाई तवंगर, उषाताई नाईक, मोनाली कुलकर्णी, पवन कदम विनोद गणवीर, बबलू शेख, विजय खंडार, दीपक इंगळे, गजानन टोम्पे, ज्ञानेश्वर वरघट, अब्दुल अजीज, मयूर राऊत, अब्दुल जुबेर, दामोदर जोंधळेकर, मंगेश बाबर, राजेंद्र शामसुंदर, डॉ. गुणवंत राठोड, अमित पजवानी, महादेव जाधव, धनंजय राठोड, महेंद्र गुप्ता आदींनी परिश्रम घेतले.
.jpg)




Social Plugin