Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड तालुक्यातील उपळा येथे रस्ता अडवून तरुणाला बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी .



.यशवंत पवार कन्नड 

कन्नड तालुक्यातील उपळा येथे रस्ता अडवून तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित हरीश देवरे यांनी कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. 

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हरीश देवरे दुचाकीवरून जात असताना विजय गायकवाड,विकास गायकवाड आणि प्रकाश गायकवाड यांनी त्यांना अडवले व 'गाडीला कट का मारला' या शिल्लक कारणावरून वाद घालत लाथा बुक्क्यांनी आणि दगड - विटांनी गंभीर मारहाण केली. देवरे यांच्या पालकांनी मध्यस्थी करून त्यांना घरी नेले, मात्र संशयितांनी हातात कुऱ्हाड,कोयते आणि हॉकी स्टिक घेऊन थेट देवरे यांच्या घरापर्यंत पाठलाग केला. कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.हा सर्व थरार घरावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संशयितांवर यापूर्वी 15 ते 20 गुन्हे नोंद असून, त्यांच्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.