प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड : येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी कु. दिव्या धनंजय गोल्हारे हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बी. ए. वाङमय स्नातक परीक्षेतील इतिहास विषयातील सुवर्णपदक आणि अर्थशास्त्र विषयातील रौप्यपदक पटकावून संपूर्ण विद्यापीठातून प्रथम येण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय ती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसरी मेरीट आलेली आहे. जीवन विकास शिक्षण संस्थाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, सचिव अमित पाटील, संचालक अक्षय पाटील, कार्यकारी अधिकारी (उ. शि.) डॉ. जे. बी. देव्हडे यांचेसह जीवन विकास शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी तिचे कौतुक केले आहे.तिला प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड, इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रीहरि पितळे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ प्रवीण हाडे यांचेसह महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ४२ व्या दीक्षांत समारंभात माजी भारतीय सेना प्रमुख जनरल मनोज पांडे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित दिमाखदार सोहळ्यात हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. कुलसचिव डॉ अविनाश असनारे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
विद्यापीठ परीक्षेत्रातील शेकडो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत, ग्रामीण भागातील एका मुलीने असा विक्रम रचणे ही विशेष कर्त्तृत्त्वाची बाब आहे. यापूर्वी याच महाविद्यालयातील कु. वैष्णवी राऊत या विद्यार्थिनीने इतिहास विषयात विद्यापीठातून पहिली येऊन सुवर्णपदक पटकाविले होते. त्यामुळे आता कु. दिव्याच्या रूपाने स्व. पुष्पादेवी पाटील महाविद्यालयास हे दुसरे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तिच्या या यशामागे तिचे आईवडील आणि कुटुंबीयांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, कार्यालयीन कर्मचारीवृंद, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे योगदान आहे.





Social Plugin