प्रतिनिधी :विजयगायकवाड
रिसोड:- स्थानिक स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे निबंध लेखन आणि परिसंवाद संपन्न झाला. कु.पायल मोरे, गणेश भोपाळे, कु. प्राची जाधव, कु.श्रुती अंभोरे, अंकुश सावसुंदर, कु.ज्ञानेश्वरी सावंत, कु. शिवानी बिल्लारी, कु. कांचन भुतेकर,कु.दुर्गा बिल्लारी यांनी परिसंवादात सहभाग घेतला यातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर.प्रकाश टाकला. जिजामाता आणि शहाजीराजे यांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते.शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थात लोकशाहीवादी राज्य निर्माण केले.एक आदर्श, मानवतवादी आणि नीतिमान असे व्यक्ती होते असा सर्वांचा सूर होता. प्राचार्य डॉ.एम.एन. गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराजांच्या युद्धनीती, राजनीती,आर्थिक,धार्मिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर डॉ.श्रीहरी पितळे, .डॉ प्रकाश हनवते, डॉ.जितेंद्र बोरसे, प्रा.भूषण सावळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. ॠतुजा कव्हर तर आभार प्रियांशुतिडकेनी केले.कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.





Social Plugin