राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथे महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीतील कणाकणाला ज्या दिवसाची वर्षभर आतुरता असते, तो सुवर्णदिन आज उजाडला आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी याच दिवशी शिवनेरीच्या मातीत एक असा तारा जन्मला, ज्याने रयतेच्या आयुष्यातील पारतंत्र्याचा अंधार कायमचा मिटवला. शिवजयंती हा केवळ एका राजाचा जन्मदिवस नाही, तर तो एका ज्वलंत विचारांचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे.अंधारातून प्रकाशाकडे
महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ हा अत्यंत भीषण होता. परकीय सत्तांच्या आक्रमणाखाली महाराष्ट्र भरडला जात होता. आया-बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती, शेतकऱ्यांच्या घामाला दाम नव्हता आणि देवळांमधील देवही परक्यांच्या दहशतीखाली होते. अशा या घनघोर काळोखात, रयतेच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आणि इतिहासाला पडलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या पोटी 'स्वराज्य' जन्माला आले. तो दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील नवी पहाट होती.
केवळ राजा नाही, तर एक विचार कलगाव ग्राम पंचायत मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर रोजगार सेवक रामराव मनवर यांनी प्रस्ताविक मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही महात्मा फुले यांनी 1870 मध्ये शोधुन काढली आणि पहिली शिवजयंती साजरी केली. दूरदृष्टी असलेले राजे होते.त्यांनी त्याकाळात गडकिल्यावर, तलावावर जे बंधारे बांधले ते आजही कायम आणि मजबुत आहे.वयाच्या आठव्या वर्षी ते तलवार बाजी, भाला.इत्यादी क्षेत्रात निपुण होते असे प्रतिपादन केले अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भारत मनवर , सदस्य मनोज आंबेकर, आत्माराम इरतकर, पोलिस पाटील सुनील राऊत, मंगेश काळकर,प्रमोद आंबेकर, सचिन राऊत, पत्रकार राजु राठोड, विवेक आंबेकर,अख्तर कुरेशी, रोहन मोहिते, जय कुरमे, कार्तिक वानखडे, जीवन राऊत, अमोल दाभाडकर, ग्राम पंचायत चे कर्मचारी शमशोदिन शेख, रोहित साळुंखे, इकरमोद्दीन व इतर नागरिक उपस्थित होते.





Social Plugin