Ticker

6/recent/ticker-posts

विश्वजीत दडस टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत विभागात प्रथम .



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मधील विद्यार्थी विश्वजीत नाना दडस यांनी टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला . त्याबद्दल प्राचार्य अंकुश भांगरे व विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी केले .स्वामी विवेकानंद सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धा रामकृष्ण परमहंस विद्यालय नागठाणे या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेत  विद्यालयातील विविध स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते .

 त्यामध्ये विश्वजीत नाना दडस, कु रिया गणपत जगदाळे, कु .ऐश्वर्या अशोक बोराटे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .यामध्ये माध्यमिक गटामध्ये विश्वजीत नाना दडस यांनी टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत विभागात प्रथम क्रमांक मिळवला . त्याला रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला व त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले .शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा . अभय राजेघाटगे , सरपंच सुजाता बोराटे मॅडम पत्रकार प्रकाश राजेघाटगे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या