Ticker

6/recent/ticker-posts

भव्य मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन.




दि 10 फेब्रुवारी

परभणी :- परभणी येथील आरोग्य खाते आशा वर्कर गटप्रवर्तक यांच्या वतीने 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. मतदानाचा भत्ता ताबडतोब आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या खात्यात जमा करण्यात यावा व 12 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या  संपामध्ये शामिल होण्यासाठी व बऱ्याच मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रावर आशा वर्कर  ने ड्युटी केलेला भत्ता याची चौकशी करून निर्णय घेण्यात येईल.

असे आश्वासन जिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांनी सांगितले व वरील मागण्या शासन स्तरावर लेखी स्वरूपात पाठवण्यात येतील व जिल्हास्तरावरील मागण्या निकाली काढण्यात येतील असे ठोस आश्वासन दिले.असे आयटक संघटनेचे     राज्य अध्यक्ष  कॉम्रेड राजू देसले उपाध्यक्ष मुगाची बुरुड सर राज्य सदस्य सचिव समता कदम राज्य सरचिटणीस माधुरीताई शिरसागर राज्य सदस्य राधाबाई पांचाळ जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी स्वामी रामा वावळे सुरेखा लटपटे रमा सावंत  एमजी जोंधळे लत्ता खंदारे शर्मिला जगतकर  दिपाली अंतुरे श्यामल एमगीर रेखा गायकवाड अलका कदम सुमित्रा सरोदे सुनिता वाबळे निर्मला आशा तिकडे कसारे शिल्पा रिंगे राधा नाईक संगीता आगलावे जास्तीत जास्त आशा वर्कर उपस्थित होत्या असे प्रसिद्धी प्रमुख शिवम पांचाळ यांनी कळविले आहे.