१५ गावांतील ६८% मतदानानंतर निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे
दौंड:पाटस-कुरकुंभ जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीचा निकाल आज, ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होत असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या गटातील १५ गावांमध्ये पार पडलेल्या मतदान प्रक्रियेची अंतिम आकडेवारी समोर आली असून सरासरी ६८.४४ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीतून उघड होणार आहे.
या निवडणुकीत नंदादेवी गावातील मतदारांनी सर्वाधिक उत्साह दाखवत ८०.६३ टक्के मतदानाची नोंद केली आहे. त्याखालोखाल कौठडी ७७.१२ टक्के, रावणगाव ७७.०५ टक्के आणि लाळगेवाडीत ७५.२९ टक्के मतदान झाले असून या गावातील वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. तर दुसरीकडे गटातील सर्वात मोठे गाव असलेल्या पाटसमध्ये ५७.६८ टक्के मतदान झाले आहे. जरी टक्केवारी कमी असली तरी १४,७८० ही मोठी मतदारसंख्या पाहता येथील मताधिक्य विजयासाठी निर्णायक ठरणार आहे.
इतर गावांमध्ये वासुंदे ७२.७० टक्के, रोटी ७२.३७ टक्के, भोळोबावाडी ६९.९२ टक्के आणि कुरकुंभमध्ये ६५.८८ टक्के मतदान झाले आहे. तसेच बिरोबावाडी ६३.५० टक्के, कुसेगाव ६२.२१ टक्के, पांढरेवाडी ६२.६९ टक्के, मळद ६२.१० टक्के, हिंगणीगाडा ६१.७३ टक्के आणि झगडेवाडीत ६१.६७ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. या संमिश्र प्रतिसादानंतर आता राजकीय वर्तुळात गणिते मांडली जात आहेत. कोणत्या गावाने कोणाला साथ दिली आणि कोणाचे 'लीड' कोणाला विजयापर्यंत पोहोचवणार याचा फैसला आज दुपारी स्पष्ट होईल.
१ पाटस १४,७८० ८,५२६ ५७.६८%
२ बिरोबावाडी १,४०३ ८९१ ६३.५०%
३ कुसेगाव २,७२३ १,६९४ ६२.२१%
४ रोटी १,०४६ ७५७ ७२.३७%
५ हिंगणीगाडा १,४४० ८८९ ६१.७३%
६ वासुंदे १,३६३ ९९१ ७२.७०%
७ लाळगेवाडी ३३६ २५३ ७५.२९%
८ कौठडी ५७७ ४४५ ७७.१२%
९ भोळोबावाडी ५६२ ३९३ ६९.९२%
१० पांढरेवाडी १,४७७ ९२६ ६२.६९%
११ झगडेवाडी ८१४ ५०२ ६१.६७%
१२ कुरकुंभ ३,७४० २,४६४ ६५.८८%
१३ मळद ३,०५३ १,८९६ ६२.१०%
१४ रावणगाव ३,७३५ २,८७८ ७७.०५%
१५ नंदादेवी १,५०३ १,२१२ ८०.६३%





Social Plugin