Ticker

6/recent/ticker-posts

गाव पुरळ कलंबई, केळये वाडी येथे व्यापारी मित्र मंडळ व रिक्षा टेम्पो यांची श्री सत्यनारायणा महापूजा संपन्न



 देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के. 

कलंबई, केळये व्यापारी मित्र मंडळ , व रिक्षा आणि टेम्पो यांच्या संघटनेने आज श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन दर सालाबाद प्रमाणे साजरा केले. तेव्हा अनेक गावातील ग्रामस्थानाने श्री सत्यनारायण महापूजेचा तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. ह्या कार्यक्रम आयोजनाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री नितीन पुजारे, उपाध्यक्ष श्री विजय पुजारे, सरचिटणीस निलेश पुजारे, चिटणीस श्री कल्पेश गुरव, खजिनदार सागर पुजारे, खजिनदार श्री दशरथ मुळम, व कार्यकर्ते पप्पी मुळम,  यांचे हे सर्व आयोजन होते, त्याच शिवाय मंडळाचे व्यवस्थापक कलंबई केळये व्यापारी मित्र मंडळ, व स्थानिक ग्रामस्थ हे होते. श्री सत्यनारायण महापूजा निमित्त येथे अनेक कार्यक्रम योजलेले होते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, स्थानिक भजने, दिंडी भजन, व बुवा श्री लवू घाडी. यांचे श्री विठ्ठल रुक्मिणी दिंडी भजन, आचरा देऊळवाडी यांचे ठेवण्यात आलेले होते. 

त्याशिवाय नाट्य वृंद   कार्यक्रम, आकर्षक अशी विद्युत रोषणाई, आकर्षक अशी साउंड सर्विस, उत्कृष्ट अशी मंडप सजावट अशी या मंडळांनी श्री सत्यनारायण महापूजेची व्यवस्था भक्तांसाठी केलेली होती. दर सालाबाद प्रमाणे ही पूजा ठेवण्यात येते. अनेक भाविक तीर्थ प्रसादाचा लाभ घेऊन श्रद्धेने व मनोभावे पूजा करून आपल्या कामधंद्याला बरकत यावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून सुख समाधान शांती आम्हास द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करून श्री सत्यनारायण महापूजेची पूजा घालून कार्यक्रम आनंदमय व उत्साह पूर्ण साजरा करतात. अनेक मंडळाचे स्थानिक कलंबई ग्रामस्थ हिराहिरीने या पूजेचे आयोजन शिस्तबद्ध रीतीने व आदरा तित्य पाहुणचार अशा पद्धतीत करतात. अनेक मान्यवर या पूजेला उपस्थिती दर्शवताना दिसतात, व त्यांचा सुद्धा येथे पाहुणचार घोषणे द्वारे केला जातो आणि त्यांना  आदर तित्य पुष्प   गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातो . तेव्हा अशी ही कलंबई केळेये वाडी व्यापारी, रिक्षा व टेम्पो यांच्या संघटनेची श्री सत्यनारायणाची पूजा थाटामाटात साजरी केली जाते.