यशवंत पवार कन्नड,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कन्नड च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक चित्रकला रांगोळी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात कन्नड शहर तसेच तालुक्यातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता
18 तारखेला सायंकाळी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद अंधानेर द्वितीय क्रमांक काशिनाथ पाटील प्राथमिक विद्यालय कन्नड तृतीय क्रमांक शिक्षण महर्षी स्व के के जाधव सर माध्यमिक विद्यालय व उत्तेजनार्थ जि.प. हतनूर साधना पाटील विद्यालय कन्नड. जि.प.नावडी यांनी मिळवला .
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तनुजा पाटील, ऋतुजा थेटे अवनी गवारे अपेक्षा शेळके श्रावणी मालकर, यांनी तर रांगोळी स्पर्धेत प्रतिभा जाधव गायत्री सोननीस अश्विनी सोनवणे वैष्णवी राठोड पूजा वाघचौरे सिद्धी हिवाळे, यांनी यश संपादन केले गुणवंत विद्यार्थ्यांना संयोजन समितीच्या वतीने सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी कार्यक्रमासाठी कन्नडच्या आमदार श्रीमती संजनाताई जाधव तहसीलदार श्रीमती सारिका भगत मॅडम नगराध्यक्षा फरीन बेगम पोलीस निरीक्षक सानप साहेब मुख्याधिकारी रवींद्र लांडे साहेब मा.नगराध्यक्षा स्वाती कोल्हे मनोज पवार सुनील पवार सुरेश चव्हाण प्रशांत बारगळ राजधर सोनवणे राजू शेख किशोर अकोलकर दिनेश शिंदे किशोर पवार शेखर शिंदे विजय भोसले सचिन आहेर अभिषेक देशमुख मनोज देशमुख संतोष पवार संतोष निळ अमोल मैराळ शिवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले
परीक्षक म्हणून निलेश काथार सहयोग जावळे अनिता चव्हाण सचिन काळे बाळूभाऊ आल्हाड प्रवीण जमदाडे भाऊसाहेब सोननीस विजय बोरसे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण दाभाडे यांनी केले.





Social Plugin