Ticker

6/recent/ticker-posts

निसर्ग मित्र देविदास थोरात यांना राष्ट्रीय वनश्री पुरस्कार जाहीर .



यशवंत पवार कन्नड 

कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील भूमिपुत्र निसर्ग मित्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग संवर्धन, पशुपक्षी संवर्धन, सैनिक मित्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या देविदास थोरात यांना शिवजयंतीनिमित्त राष्ट्रीय वनश्री पुरस्कार सन 2026 जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र राज्यस्तरावरून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. हे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था 27 राष्ट्रांमध्ये पर्यावरणासाठी कार्य करीत आहे. निसर्ग मित्र हे गेल्या दहा-बारा वर्षांपासून निस्वार्थ सेवा निस्वार्थ श्रमदान आजपर्यंत करत आले आहे.

 याची शहानिशा करून वृक्षारोपण, संवर्धन, पशुपक्ष्यांसाठी दानापाणी, जखमी पशु पक्षांना वाचवणे, मृत्यू झालेल्या माकडांचे अंत्यसंस्कार करणे, वृक्षापासून प्रेरणा घेत पती-पत्नीने देहदान संकल्प केला आहे. नियमितपणे रक्तदान करून अनेकांना जीवन संजीवनी दिली आहे. त्याचबरोबर शहीद जवानांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण व एक दिया शहीदो के नाम दरवर्षी उपक्रम, झाडांच्या खोडातील खिळे काढणे, खोडकीड लागलेल्या झाडांना औषधी लावणे, रानभाज्या फळभाज्या वनस्पती यांची माहिती देणे, जनजागृती करणे, इत्यादी कार्य ध्येयवेडे होऊन अवलिया  निसर्गमित्र देविदास थोरात हे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थ सेवा करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध प्रशासकीय सन्मानपत्र शिफारस पत्र व अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहे.