Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक सन्मान पुरस्कार प्रा डॉ विजय गायकवाड यांना जाहीर.



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड : हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा येथील आदर्श सेवा निवृत मुख्याध्यापक श्री रामराव शंकरराव गायकवाड यांचे सुपुत्र व स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा डॉ विजय शशिकला रामराव गायकवाड यांना भारत सरकार व्यवहार मंत्रालय अधिकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक सन्मान पुरस्कार जाहीर झाला असुन त्यांना तसे पुरस्काराचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. 

प्रा डॉ विजय गायकवाड यांची ह्या पुरस्कारासाठी निवड ही त्यांनी अनेक वर्षे केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाची प्रेरणा व मूल्याधिष्ठित मार्गदर्शन देत ऊभारलेल्या कार्याचा ठसा हा अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वगुण व अथक परिश्रमामुळे समाजातील अनेक होतकरू गरीब विद्यार्थी यांना नवी दिशा व उभारी मिळालेली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना नाशिक येथे 01 मार्च 2026 रोजी हा पुरस्कार महाराष्ट्राचे कॅबिनेट शालेय शिक्षण मंत्री, नाशिकचे पालक मंत्री,नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक श्री दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण कंझुमर प्रोटेक्शन कमिटी व डॉ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव यांनी दिली आहे.