Ticker

6/recent/ticker-posts

राणीगाव घाटात झालेल्या दुखद दुर्घटनेत मृत झालेले व जखमींना आर्थिक मदत.

 


आरिफ खान पठाण मेळघाट, प्रतिनिधी  महाराष्ट्र ग्रामीण न्यूज 

नवनीत राणा यांनी मा मुख्यमंत्री साहेब यांना पत्रा द्वारे राणीगाव घाटात झालेल्या दुखद दुर्घटनेत मृत झालेले व जखमींना आर्थिक मदत व रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची विनंती केली.

मेळघाट मधील पिकअप वाहन दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू व १२ जण जखमी झालेल्या घटनेबाबत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत्त, व मृत व्यक्तींना २५ लक्ष व जखमीना १० लक्ष रू तात्काळ उपचार व संबंधित रस्त्याचे कॉन्ट्रक्टर बेरर इंडस्ट्रीज अमरावती यांच्यावर मनुष्य बळाचा गुन्हा दाखल करून तसेच शासकीय अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यावर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट पने पत्र लिहून  मा,मुख्यमंत्री यांना केली आहे,नवनीत राणा हे मेळघाटा च्या जनते सोबत ठाम पने  उभे राहणारे तसेच मेळघाटातील सामस्यांना संसदेत मांडण्याचा सदैव प्रयत्न केले ,दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावती जिल्हयातील मेळघाट धारणी तालुक्यातील शिवझिरी जवळ रानिगाव घाटात मजुरांनी भरलेली पिकअप वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ५ निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

ही घटना अत्यंत दुःखद व मन हेलावून टाकणारी आहे. संबंधित कुटुंबांवर मोठे संकट कोसळले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सदर अपघात ज्या मार्गावर घडला, त्या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आहे व घाटातील पुर्ण रस्ता उखडला आहे. या मार्गावरील रस्त्याचे बांधकाम जो कोणी कंत्राटदार काम करत आहे किंवा केले आहे तो या घटनेला तेवढाच जबाबदार आहे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना, इशारे फलक, संरक्षक कठडे (गाडरेल) इत्यादीची कमतरता असल्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेळघाट मधील पिकअप वाहन दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू व १२ जण जखमी झालेल्या घटनेबाबत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत, व मृत व्यक्तींना २५ लक्ष व जखमीना १० लक रू तात्काळ उपचार व संबंधित रस्त्याचे कॉन्ट्रक्टर बेरर इंडस्ट्रीज अमरावती यांच्यावर बळाचा गुन्हा दाखल करून तसेच शासकीय अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यावर सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी.त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत.


१. मृतांच्या कुटुंबियांना शासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.

२. जखमींवर शासकीय खर्चातून उत्तम वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करण्यात यावी.

३. संबंधित रस्त्याच्या बांधकामाची तांत्रिक चौकशी करून कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कडक प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी.

४. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सदर भार्गावर आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना तात्काळ करण्यात यावी. आपण या गंभीर घटनेकडे मानवी दृष्टिकोनातून व प्रशासनिक जबाबदारीने पाहून तातडीने कार्यवाही करावी. अशी विनंती माजी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे,