Ticker

6/recent/ticker-posts

बिलोलीत महावितरणच्या शासकीय विजबिल भरणा केंद्राची गरज.



••• २९ गावासाठी एकही शासकीय विजबिल भरणा केंद्र नाही

••• खाजगी विजबिल भरणा केंद्राची मनमानी

बिलोली प्रतिनिधी ~ आमेटवार राजेश

बिलोली तालुका हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवरील तालुका असुन तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अनेक सोयीसुविधात महाराष्ट्र बॅकफूटवर असल्याची नागरिकांची ओरड आहे तसाच प्रकार तेलंगणा राज्यात २०० युनिट विज बिल माफ आहे गावागावात शासकीय विजबिल भरणा केंद्र आहेत तर महाराष्ट्रातल्या बिलोली तालुक्यात चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी गावांनमध्ये महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रच नाही बिलोली अंतर्गत येणाऱ्या ऊप कार्यकारी अभियंता कार्यालय अर्जापुर येथे नियमानुसार शासकीय विजबिल भरणा केंद्र आवश्यक आहे मात्र शासकीय विजबिल भरणा केंद्र नसल्याने नाईलाजास्तव खाजगी विजबिल भरणा केंद्राकडे पायपीट करावी लागते ग्राहकांनची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने शासकीय विजबिल भरणा केंद्र सुरू करावेत अशी मागणी जोर धरत आहे तालुक्याती शासकीय विजबिल भरणा केंद्र गायब होऊन खाजगी विजबिल भरणा केंद्र वाढत असल्याने महावितरणच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मार्च एन्ड पुर्वी महावितरण विभागाची विजबिल भरणा करुन घेण्याची लगभग असते अन्यथा थकीत विजबिल ग्राहकांची विज पुरवठा खंडीत केला जातो व पुनर्रजोडणीसाठी ग्राहकांची आर्थिक लुट केली जाते मात्र शासकीय विजबिल भरणा केंद्र नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत असुन खाजगी विजबिल भरणा केंद्र मनमानी करत कधीही बंद करणे कधीही चालू करणे यामुळे ग्राहक चांगलेच वैतागले आहेत बिलोलीत महावितरणच्या शासकीय विजबिल भरणा केंद्राची गरज असुन ताबडतोब चालू करावे अशी मागणी ग्राहक करीत आहेत लाईनमन हे वसुली करत आहेत मात्र ग्राहकांकडून पैसे घेऊन आठ - आठ दिवस विजबिल भरत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे अशी ग्राहकांची ओरड आहे. 

चौकट - कॅशिअर नसल्याने शासकीय विजबिल भरणा केंद्र उपलब्ध नाहीत खाजगी विजबिल भरणा केंद्र उपलब्ध आहेत व लाईनमन यांच्या कडे वालेट दिले आहेत ते देखील विजबिल भरून घेउ शकतात अशी माहिती ऊप विभागीय कार्यकारी अभियंता भैरवनाथ पाटील यांनी दिली आहे.