Ticker

6/recent/ticker-posts

सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर रंगल्या बजेट गप्पा

 


यशवंत पवार कन्नड ( छत्रपती संभाजीनगर )

१ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला.   केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात बजेट-२०२६ यावर चर्चा व्हावी आणि यातील बारकावे समजावे या अनुषंगाने सहकार  महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या वतीने दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी  ११ वाजता  बजेट - २०२६ चे थेट प्रक्षेपण आणि बजेट गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कन्नड शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, व्यापारी, शेतकरी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. 

या चर्चेत कन्नड शहरातील एमआरएफ टायर शोरूमचे संचालक श्री. आदिनाथ शिंदे यांनी व्यापाराच्या अनुषंगाने अंदाजपत्रकातील तरतुदीवरती भाष्य केले. तसेच वाढत्या जीएसटी मुळे टायर विक्री व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी व्यक्त केल्या. 

श्री. असिफ शेख यांनी नवउद्योजकांसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा सहजपणे मिळण्यासाठी आवश्यक असणारे घटक सहजपणे मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले. 

यश पाटील यांनी अंदाजपत्रकातील सूक्ष्म, लहान आणि मध्यम  उद्योगाच्या संदर्भातील असलेल्या तरतुदीवरती भाष्य केले.

प्राध्यापक सोमेश मोगरे यांनी प्रत्यक्षामध्ये रोजगार वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची अंदाजपत्रकामध्ये कमतरता असल्याचे मत नमूद केले.

हर्षल भोसले यांनी शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता नमूद केली.

 ग्रंथपाल संतोष देशमुख यांनी लाईव्ह अंदाजपत्रकाचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंदाजपत्रक सहज समजण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

 यावेळी प्रा. सिताराम मोगल, प्रा. अमोल सरोदे, रोहित क्षीरसागर,  रेणुका भिलांगे, संदीप कुलकर्णी, पूजा गोरे, कोमल निकम, पलक भारुका, रोशन राठोड, आकाश राठोड, कृष्णा जाधव, आदीसह विद्यार्थ्यांनी बजेट संदर्भातील चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश सोनवणे, ऋषिकेश शिवदे, आकांशा श्रीकांत यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनिल गोरडे आणि आभार डॉ. राकेश अहिरराव यांनी व्यक्त केले.