Ticker

6/recent/ticker-posts

संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराजांच्या 449 व्या जयंती उत्साहात साजरी.



यशवंत पवार कन्नड 

कन्नड शहरातील इंदिरानगर चांभार टेकडी येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी चर्मकार समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्री रेणुका माता मंदिर संस्थानचे श्री विश्व माई वारकरी शिक्षण व आध्यात्मिक गुरुकुल अध्यक्ष ह भ प श्री विष्णुपंत महाराज काळे यांच्या जाहीर हरी कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी श्री गुरु रविदास महाराज हे 15=16 व्या शतकातील भक्ती चळवळीतील एक महान संत कवी आणि समाज सुधारक होते वाराणसी येथे जन्मलेले संत रविदास महाराज चर्मकार समाजात जन्मले तरी त्यांनी आपल्या भक्ती व ज्ञानाने चारही वर्णात पूजनीय स्थान मिळवले त्यांनी समता माणुसकी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडले तसेच त्यांचे अनेक अभंग गुरुग्रंथ साहिबात समाविष्ट आहे

 याप्रसंगी संस्थांचे ह भ प श्री शिवदत्त महाराज राजगुरू तसेच त्यांचे गुरुकुल आश्रमातील बाल गोपाल शिष्य यांच्या उपस्थितीत गुरु रविदासाचे चरित्राचे वर्णन केले याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री शेकुजी जयस्वाल माजी नगरसेवक खादीग्राम उद्योग चेअरमन श्री राजेंद्र गव्हाणे कल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप चिकसे संस्थेचे संचालक श्री फुलसिंग घट्टरसिंग श्री सतीश पद्मे पंचायत समितीचे श्री विजयजी वासने श्री नाना उसरे श्री दिनेश जठार एडवोकेट श्री संतोष निमरोट श्री लक्ष्मण जयस्वाल सर श्री बबन जाधव श्री दीपक वाघ श्री वैभव जैस्वाल श्री दीपक रमणे श्री मोतीलाल शेवाळे श्री किसन वाघ श्री गुलाब वाघ श्री मोतीलाल शिरे श्री लालचंद वाघ श्री रमेश चव्हाण श्री मगन डोंगरे श्री बिरारी सर श्री बाविस्कर साहेब श्री दीपक डोंगरे श्री विठ्ठल जाधव श्री बाबूलाल नागणे श्री देवमन शिरे श्री शामलाल चिकसे श्री गणेश साळुंखे याप्रसंगी मोठ्या संख्येने चर्मकार बंधू-भगिनी महिला उपस्थित होते यानंतर महाप्रसादअन्नदान  ने जयंतीच्या समारोप करण्यात आला