Ticker

6/recent/ticker-posts

Mahindra & Mahindra निघोजे गेटसमोरील गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने अपघाताला निमंत्रण.



दिनकर बोरकर|प्रतिनिधी  निघोजे (ता. खेड) –

Mahindra & Mahindra कंपनीच्या निघोजे गेटसमोर असलेला गतिरोधक पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांशिवाय

असल्यामुळे वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा गतिरोधक स्पष्ट दिसत नसल्याने अचानक ब्रेक लावावे लागत आहेत.

दररोज या मार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, अवजड वाहने तसेच दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र गतिरोधकावर परावर्तक पांढरे पट्टे नसल्याने अनेक वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी घसरणे, वाहनाचे नुकसान होणे तसेच किरकोळ अपघातांच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने गतिरोधकावर पांढरे परावर्तक पट्टे रंगवणे, तसेच सूचना फलक लावणे अत्यावश्यक आहे. संबंधित ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून संभाव्य मोठा अपघात टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.