बुध , दि. [प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता. खटाव येथे आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा प्रथम वर्धापन सोहळा श्री स्वामी समर्थ्याच्या जयघोषात उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले .
श्री स्वामी समर्थ महाराजांचा बुधमध्ये आरती चालू होऊन १वर्ष पूर्ण झाले आहे . त्यानिमित्त प्रथम वर्धापन दिन मोठ्या संख्यांमध्ये सेविकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .
त्यानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या आगमन सकाळी झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती . पादुकांचे विधीवत पुजन करून अभिषेक करण्यात आला .भूपाली आरती करून चरित्रसारामृत पाठ वाचन करण्यात आले . त्यानंतर महानैवदय आरती झाली . श्री स्वामी समर्थ ११ माळी नामस्मण करण्यात आले . पालखीमध्ये पादुका विधीवत ठेवण्यात आल्या .रथामध्ये श्री स्वामी समर्थाचे अधिस्टाण ठेवण्यात आले . पालखी व रथाच्या भव्य मिरवणुकीने , श्री स्वामी समर्थांच्या घोषात , लेझीम , तुतारी , टाळाच्या गजरात भक्तिफ्प आणि उत्साही वातावरणात झाली . जोतीबा मंदिरापासून मिरवणुकीला सुरूवात झाली . भाविक आणि ग्रामस्थांनी जागोजागी पालखी व पादुकांचे दर्शन घेत श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या घोषणा दिल्या . मंदिरापासुन निघालेल्या मिरवणुकीत खटाव व मण तालुक्यातील सेवेकरी , लेझीम पथक ,डिजे , तुळशी घेतलेल्या महिला सेवेकरी , पताके , टाळ घेतलेल्या महिला , आकर्षक पोखाख परिधान केलेले पुरूष व महिला सेवेकरी लक्षवेधक ठरल्या . महिला व पुरूषांनी चौका चौकात उभे रिंगण केले . व जागोजागी फुगडया खेळल्या . पादुका प्रदक्षिणा व स्वामींची रथ यात्रा संपूर्ण गावातून झाल्यानंतर विविध पादुका व श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिस्टान मंदिरात आणले . त्यानंतर मंदिरामध्ये आरती करण्यात आली .





Social Plugin