मन्सूर शहा धोतरा भंगोजी चिखली.:-
शहरातील जयस्तंभ चौक परिसरात रविवारी दुपारी अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. हांडगे मामा हॉटेल लाईनमधील अंदाजे 10 ते 15 दुकानांना या आगीने वेढा घातल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार गॅस लिकेजमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच ज्वाळांनी अनेक दुकानांना कवेत घेतल्याने मोठे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सध्या बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात येत आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.





Social Plugin