Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर येथे रस्ता सुरक्षा क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान.



सतीश पांडे प्रतिनिधी 

ळमेश्वर: नागपूर येथे ROADMARC Foundation (Road Accident Disaster Management & Research Centre) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रस्ते अपघात मुक्तीचे शिल्पकार – रस्ता सुरक्षा पत्रकार” या कार्यशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा विषयक समाजसेवक व रुग्णसेवक मा. मंगेशभाऊ गमे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणे व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.