Ticker

6/recent/ticker-posts

घरेलू कामगारांना 2023 पासून योजना लाभापासुन वंचित...



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

मेहकर:-घरेलू महिला शासकिय कामगार योजने पासून 2023 पासून कोणताही लाभ मिळाला नाही. अशी तक्रार अनेक महिलांनी केली. यामध्ये महिला कामगारांना भांडे मिळावी अशी कळकळीची व विनंती करत आहे. महिलांनी दोन ते तीन वेळेस रिन्यूअल सुद्धा केलेले आहे. तरीसुद्धा संबंधित मंत्र्यांनी यांची दखल घेतली नाही. तरी लवकरात लवकर कामगार मंत्र्यांनी या घरेलू महिला कामगारची दखल घेऊन निर्णय घ्यावा. नाहीतर ह्या महिला कामगार मंत्र्याच्या घरासमोर  मोर्च्या काढण्याचा निर्णय घेत आहेत.