"सन्मान कर्तृत्वाचा सन्मान नारिशक्तीचा "जागतिक महिला दिन उत्सहात साजरा
प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
स्थानिक सहकार विद्या मंदिर दे माही येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहात संपन्न झाला..यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर ,तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अप्पाराव खेडेकर हे उपस्थित होते..सदर कार्यक्रमात सर्व महिला शिक्षिकाना व तसेच सर्व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते..यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व पर्यवेक्षक यांनी सर्व महिला शिक्षिकांचे मोठ्या आदराने स्वागत केले..यावेळी गवई मॅडम ,प्रतिभा मॅडम भोरजे मॅडम,मोरे मॅडम यांनी महिला दिनाचे महत्त्व विध्यार्थ्यांना सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष इंगळे सर यांनी सुद्धा महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देऊन महिला दिनाचे महत्व विशद केले..सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोरे मॅडम यांनी केले..





Social Plugin