आकाश रुमणे/ नांदगाव खंडेश्वर, दि 30
आ प्रतापदादा अडसड यांचा पाठपुरावा वीज बिला पासून मिळणार मुक्ती
धामणगाव रेल्वे-तिन्हीतालुक्यातील जलजीवन मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर सोलर युनिट बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. दरम्यान आता या पाणीपुरवठा योजना वीज बिलापासून मुक्त होणार आहे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर हे तीन तालुके येत असून, तालुक्यातील ग्रामीण भागात जलजीवन मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या आहे. सदर पाणी पुरवठा योजनेचे विद्युत देयके ग्राम पंचायतीला मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे ग्राम पंचायत कडून ती देयके भरणे शक्य होत नाही काही ठिकाणी थकीत वीज देयकामुळे पाणीपुरवठा विद्युत खंडित करण्यात येते.
नांदगाव खंडेश्वर 113, चांदूर रेल्वे 76, धामणगाव रेल्वे तालुक्यातील 52 जलजीवन मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर सोलर युनिट बसविण्या साठी आमदार प्रतापदादा अडसड यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला.
त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आगामी काळात तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेवर सोलर युनिट बसविण्यात येणार आहे यासाठी प्रशासन स्तरावर ही प्रक्रिया सुरू आहे.
आमदार प्रतापदादा अडसड यांनी धामणगाव मतदार संघातील पाणीपुरवठा योजनेवर सोलर युनिट बसविण्यासाठी पुढाकार घेतल्याने तिन्ही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रा.प सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे.
प्रत्येक शासकीय कार्यालयावर आता सोलर युनिट तिन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, आयटीआय तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एस डी ओ कार्यालय, तसेच सर्व प्रशासकीय कार्यालयावर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मेळा मधून सोलर युनिट बसविण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांनी पुढाकार घेतला आहे ही प्रक्रिया धामणगाव मतदार संघात युद्ध स्तरावर राबविण्यात येत आहे. आगामी काळात या शासकीय कार्यालयावर सोलर युनिट बसविण्यात येणार असल्याने विज बिला पासून मुक्ती मिळणार आहे.-खत्री जनरल अॅण्ड टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज





Social Plugin