दुधगाव (ता. मिरज) :
“माझा गाव, निरोगी गाव” या अभियानांतर्गत संकल्प फाउंडेशन, दुधगाव व स्पंदन हॉस्पिटल, आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. सुमित कबाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निखिल नलवडे यांनी त्यांचे स्वागत व प्रास्ताविक करताना सांगितले की, “गावातील प्रत्येक नागरिक निरोगी राहावा हा आमचा मुख्य उद्देश असून, अशा आरोग्य शिबिरांद्वारे जनजागृती करून अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील.” तसेच संस्थेच्या संचालकांमार्फत डॉक्टर व सहकारी टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमात दिपक मगदूम व वळवडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संकल्प फाउंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विजय आडमुठे यांनी या शिबिराचा गरजू नागरिकांना निश्चितच मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
या शिबिरामध्ये सुमारे 200 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात HB, रक्तदाब (BP), रक्तातील साखर, BMI, लिपिड प्रोफाइल, ECG तपासणी करण्यात आली. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी उपसरपंच अविनाश भोसले, दिपक मगदूम, वळवडे सर, विक्रम कदम, संकल्प फाउंडेशनचे सचिव शरद माने, खजिनदार अमोल यादव, कार्यवाह संजय मोरे तसेच संचालक डॉ. विजय आडमुठे, दिनकर सिद्ध, विवेक यादव, प्रमोद शिपुगडे, संदीप बादरे, अक्षय नलवडे, सुशांत आडके, देवेंद्र शिपुगडे, अन्वित मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष रोहित शिपुगडे यांनी मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सदस्य तसेच ग्रामपंचायत दुधगाव, डॉ. विजय आडमुठे, डॉ. अनिरुद्ध जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
--





Social Plugin