भोकर प्रतिनिधी
दिपक तोडे
दिनांक 25 मार्च 2026
भूरभूशी येथील हेडमास्तर संतोष संधीकर यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी माहिती, आपसी बदल्या आणि राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कारांशी संबंधित उपक्रम राबवणारे एक व्यासपीठ आहे FlipHTML5. हे पॅनल शिक्षकांच्या बदल्यांसाठी उमेदवार शोधण्यात मदत करते आणि आदर्श शिक्षक पुरस्कारांसारखे उपक्रम आयोजित करते.
महाराष्ट्र शिक्षक पॅनलची प्रमुख वैशिष्ट्ये:
आपसी बदल्या (Mutual Transfer): शिक्षक पॅनलच्या माध्यमातून शिक्षक आपापल्या सोयीच्या ठिकाणी जाण्यासाठी आपसी बदल्यांचे उमेदवार शोधू शकतात.
पुरस्कार: महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) द्वारे राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कारांचे आयोजन केले जाते.
माहिती व चर्चा: हे व्यासपीठ शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित उपयुक्त माहिती शेअर करण्यासाठी कार्य करते.
सामाजिक व्यासपीठ: फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक आपल्या समस्या आणि प्रश्न मांडू शकतात.
टीप: हे पॅनल विशेषतः शिक्षक संघटना किंवा शिक्षक समन्वय व्यासपीठ म्हणून कार्यरत असल्याचे दिसते.
जि. प. प्रा. शा. भुरभूशी येथील मुख्याध्यापक श्री. संतोष जनार्धनराव संधीकर यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनेल तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. संतोष संधीकर हे उपक्रमशील शिक्षक म्हणून भोकर तालुक्यात ओळखले जातात. विद्यार्थिप्रिय असणारे संतोष संधीकर यांची भोकर तालुक्यात 10 वर्षे सेवा झाली आहे. त्यांची एकूण 23 वर्षे सेवा झाली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
येत्या 17 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार शिर्डी येथे दिला जाणार आहे.





Social Plugin