Ticker

6/recent/ticker-posts

कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न..



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

रयत शिक्षण संस्थेचे, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा येथे महाविद्यालयाच्या कला मंच, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) केंद्राचे उद्घाटन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा  मोठया उत्साहात संपन्न झाला.  उदघाटक  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी ISA (Retd.)यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा व शिका’ या तत्वज्ञानाचा उल्लेख करत शिक्षणासोबत कौशल्य विकासाला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून देखील उल्लेख केला.  विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  मा. खासदार रामशेठ ठाकूर (सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था, सातारा)  यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करत ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले आहे, असे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळेल व त्यातून त्यांचे करिअर घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे (व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या आधुनिक युगात शिक्षणासोबत तंत्रज्ञानाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून समाजाच्या विकासात योगदान द्यावे. 

कला मंचासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी मा. आमदार सुनील भुसारा (सदस्य, जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था, सातारा व सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मा. प्रकाश निकम (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मा. अमोल पाटील (नगराध्यक्ष, नगरपंचायत मोखाडा), मा. विकास देशमुख (सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा), मा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे (सहसचिव, उच्च शिक्षण विभाग), मा. बंडू पवार (सहसचिव, माध्यमिक विभाग) मा. डॉ. राजेंद्र मोरे (सहसचिव, ऑडिट), मा. वाय. टी. देशमुख (व्हा. चेअरमन, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेल व सदस्य, जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था, सातारा), मा. प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे (सचिव, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेल), मा. मोहन कोंगरे (विभागीय अधिकारी, रायगड विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा) आणि मा. श्री. कुणाल लाडे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) यांची उपस्थित होती. यावेळी विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात  आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. चांदोरे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. मेंगाळ, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी  यांनी मेहनत  घेतली.    या कार्यक्रमास परिसरातील मान्यवर नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित  होते. सूत्रसंचालन प्रा. के. के. पारधी  व प्रा. आर. डी. घाटाळ यांनी केले.