Ticker

6/recent/ticker-posts

स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात महिला दिन कार्यक्रम संपन्न.



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड : येथील स्व.पुष्पादेवी पाटील कला व  विज्ञान महाविद्यालयात गृह- अर्थशास्त्र विभाग,महिला विकास समिती, महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण' या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.एम.एन.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मंचावर‌ प्रा.पल्लवी देशमुख,डॉ.आम्रपाली भगत.डॉ. छाया खिल्लारे, डॉ. आदिनाथ बदर,कु. साक्षी जोगि,छाया खरबळ यांची उपस्थिती होती. प्रतिमा पूजनाने  कार्यक्रमाचे रितसर उद्घघाटन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून 'महिला सक्षमीकरण' या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.एम.एन.गायकवाड यांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त करताना अगदी मानवाच्या उत्क्रांती पासून ते थेट आजपर्यंतच्या स्त्री जगण्याचा  सखोल आढावा घेतला. स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक, राजकीय जीवनावर प्रकाश टाकला.  बौद्धिक,आर्थिक,आध्यात्मिक समानता शिक्षणातून साध्य होते असे विचार डॉ. आम्रपाली भगत यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक कांचन पांडुरंग वानखेडे हिने केले, तर  कु.श्रद्धा सोमेश्वरआप्पा मखमले,

कु. पायल किशोर मोरे,  कु. प्राची आकातराव जाधव,  कु. श्रुती पुरुषोत्तम अंभोरे, कु. वैष्णवी अनमोल पडघान, प्रियांशू महेश तिडके,यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जान्हवी उमाकांत मैद हिने तर आभार कु.प्रज्ञा मनोहर धांडे. हिने मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील  प्राध्यापिका, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.