Ticker

6/recent/ticker-posts

भेंडा येथे मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.



भेंडा बु // ग्रामीण प्रतिनिधी 


 स्वस्तिक नेत्रालय आणि फुलारी क्लिनिक, भेंडा यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडा येथे मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर सोमवार, दि. 9 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भेंडा बु. गणगाव रोड, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे होणार आहे.

या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदूवरील अत्याधुनिक ‘फेको’ (PHACO) पद्धतीची शस्त्रक्रिया अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची विशेष नेत्रतपासणी, बालकांची नेत्रतपासणी, तसेच डोळ्यांतील विविध आजारांचे निदान व सल्ला दिला जाणार आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही विनाटाके, विनापट्टी, विनाइंजेक्शन आणि वेदनारहित पद्धतीने करण्यात येणार असून, PHACO शस्त्रक्रिया केवळ ५५०० रुपयांत उपलब्ध असेल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

या शिबिरासाठी तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल चौधरी (M.B.B.S., D.O., D.N.B., FICO (UK), FCRS) उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. नाव नोंदणी आवश्यक असून, इच्छुकांनी 7276058974 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फुलारी क्लिनिक, भेंडा यांच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी असे नेत्रतपासणी शिबिर नियमितपणे आयोजित केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन फुलारी क्लिनिकचे डॉ. संतोष श्रीपतराव फुलारी यांनी केले आहे.