Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोलीच्या प्रा डॉ विजय गायकवाड यांना राज्यस्तरीय डायनामिक इंडिया अवार्ड जाहीर.




प्रतिनिधी :  विजय गायकवाड

हिंगोली :  आंतरराष्ट्रीय नामांकन (आय एस ओ 9001-2015) प्राप्त  डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया द्वारा आयोजित ' राज्यस्तरीय  डायनॅमिक इंडिया अवॉर्ड  2026' साठी  हिंगोली येथील  *प्रा डॉ विजय शशिकला रामराव गायकवाड* यांची निवड करण्यात आली.  *शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता* क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी  *प्रा डॉ विजय गायकवाड* यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.  डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया व  मातृशक्ती संतोषी फाउंडेशन द्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी "राज्यस्तरीय  डायनॅमिक इंडिया अवॉर्ड 2026 पुरस्काराचे" आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर, वकील, महिला, सहकार, पतसंस्था, कला, इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये  *हिंगोली* येथील *प्रा डॉ विजय गायकवाड* यांची  *शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता* क्षेत्रातील  डायनामिक इंडिया अवार्ड 2026 पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून  रविवार दिनांक 15  मार्च 2026 रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ  हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते  *प्रा डॉ विजय गायकवाड* यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.