Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वर येथे प्रथमच भव्य पारंपारिक हनुमान जयंती उत्सव व मिरवणूक



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर येथे इतिहासात प्रथमच भव्य आणि दिव्य अशा पारंपारिक पद्धतीने हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून, गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, दुर्गोत्सव मंडळे, गणपती मंडळे तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा, ढोल-ताशा पथके, धार्मिक देखावे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून Navneet Rana या लाभणार असून, तसेच कार्यक्रमात डॉ. भूषणजी पोतदार (संयोजक), किशोरजी शिरभाते (अध्यक्ष), अक्षयजी पारसकर (उपाध्यक्ष), अविनाश ब्राम्हणवाडे (सहसचिव), राजेशजी पाठक (कोषाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी नांदगाव खंडेश्वर व संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक व भव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

“सर्वांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.”