Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन शहरात महीला आणि मुली साठी सार्वजनिक शौचालय आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत सामाजिक कार्यकर्त्या प्रा.अनिता ताई अंकुश जाधव यांची मागणी



भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील  भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर महिला व युवतीं साठी शौचालय व सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा:- अनिता जाधव 

भोकरदन:- भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी व महिला व युवतींच्या सुरक्षिततेसाठी भोकरदन शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ अनिताताई जाधव यांनी भोकरदन नगर परिषदेच्या नगराध्यक्षा समरीन नाज मिर्झा व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे, यावेळी नगराध्यक्षा समरीन नाज मिर्झा यांनी निवेदन स्वीकारले.

याविषयी अधिक माहिती अशी की,

भोकरदन नगर परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या सौ अनिताताई जाधव यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन शहरात पोलीस स्टेशन पासून तर जालना रोड, नवीन भोकरदन पर्यंत तसेच महात्मा फुले चौकापासून (सिल्लोड रोड) तर जाफराबाद रोड भोकरदन शहरहद्दी पर्यंत तसेच बाजारपट्टी भागातील भाजीपाला विक्रेत्या महिलांसाठी कुठेही शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे महिला व मुलींना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते अनेक मुली भोकरदन शहरात शिक्षणासाठी येत असतात तर अनेक महिला बँक तसेच कार्यालयीन कामानिमित्त व बाजारपेठेत खरेदीसाठी अनेक महिला भोकरदन शहरात येत असतात परंतु शहरात महिला व मुलींसाठी शौचालयाची सुविधा नसल्याने अनेक मुली कमी पाणी पितात व कमी पाणी पिल्याने महिलांना व युवतींना अनेक आरोग्य समस्या निर्माण होत असुन शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, लघवीत जंतू संसर्ग, मूत्रपिंडात खडे तयार होणे, बद्धकोष्ठता (Constipation), त्वचा कोरडी होणे,थकवा व अशक्तपणा यासह शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास ऊर्जा कमी होते आणि पाण्याची कमतरता असल्यास वारंवार डोकेदुखी होऊ शकते एकंदरीत महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पोटाचे तसेच किडनी स्टोनचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे भोकरदन शहरात मुख्य रस्त्याच्या कडेला महिला व मुलींसाठी शौचालयाची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात यावी, तसेच भोकरदन शहरात सर्व मुख्य रस्त्यांवर व चौकांमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणेकरून महिला व मुलींच्या सुरक्षेस मदत होईल अशी देखील मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर यावेळी समरीन नाज वसीम बेग मिर्झा, नगराध्यक्षा, नगरपरिषद भोकरदन, सौ. सुरेखाताई बालूअण्णा जाधव उपनगराध्यक्षा, नगसेवक भूषणजी शर्मा, नगरसेविका सौ. शिलाताई भारती यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.